पर्यावरण प्रेमीच्या हाकेला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले धावून अजनी वन चा लढा आता राजकीय पटलावर, आरे च्या धर्तीवर नागपूर येथील अजनी वन वाचवण्यासाठी शिवसैनिकांचा लढा:- प्रा. शिल्पा बोडखे

मुंबईतील आरे वन वाचविण्यासाठी आदित्य ठाकरे जी यांची भुमिका महत्वाची ठरली त्यामुळे नागपूरातील शिवसेना कार्यकर्त्यांना अजनी वन साठी दिशा मिळाली त्याअनुशंगाने प्रा. शिल्पा बोडखे यांनी अजनी वन चा विषय पर्यावरण मंत्री यांची भेट घेऊन कायद्या नुसार कारवाई करण्याची मागणी केली, तसेच हजारो सोशल मिडीया पर्यावरणवादी समर्थकांना घेऊन #SaveAjniVan हा ट्विटर ट्रेंड टाॅप वर चालवला.

नागपूरकरांचा विकासाला विरोध नाही पण पर्यावरण हानी न करता IMS प्रकल्प पर्यायी जागेवर करावा ही मागणी आहे. तसेच #अंबाझरीउद्यान #अजनीवन व इतर परिसरात झालेल्या वृक्षतोडी बाबत RTI मधून पुढे आलेली माहिती आणि मनपा ने दिलेली माहिती संभ्रम निर्माण करणारी असल्याचे शिल्पा बोडखे यांनी सांगितले.

कंत्राटदार मनपा कडून परवानगी घेऊन झाडे तोडल्याचे सांगतात तर मनपा कुणालाही झाडे तोडण्याची परवानगी दिली नाही असे सांगते, जर परवानगी दिली नाही तर उद्यान विभागाने कारवाई का केली नाही असा प्रश्न शिल्पा बोडखे यांनी उपस्थित करून भोगंळ कारभार उघड केला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here