न्यूज डेस्क – एकीकडे कोरोनाचे संकट असतांनाच दुसरे संकट बर्ड फ्लू येवून ठेपले, परभणीमधील मुरंबा गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये ८०० कोंबड्या मृत्य अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्षांची नमुने, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला, असे आता निष्पन्न झाले आहेय
दरम्यान, गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
मुरूंबा (ता.परभणी) गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. त्यामुळे पशूसंवर्धन विभागाचे पथक तेथे तळ ठोकून आहे.