उद्योजक विवेक पारसकर ह्यांचे तर्फे अकोला शहर वाहतूक पोलिसांना रेफलेक्टर जॅकेट व नाईट LED बॅटन ह्याचे वितरण…

अकोल्यात सद्य स्थिती मध्ये चारही बाजूला प्रमुख रोड तसेच उड्डाण पुलाची बांधकामे सुरू असल्याने वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रोडवर सतत हजर राहून कार्य करावे लागत आहे,कधी कधी रात्री चौकातील विद्युत खंडित झाल्यावर वाहतूक नियोजन करतांना अंधारात त्रास होतो,

ह्यातून एखादा अपघात घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, ही बाब हेरून अकोला येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक व पारसकर हुंडाई चे संचालक विवेक पारसकर ह्यांनी आज शहर वाहतूक शाखेत स्वतः येऊन वाहतूक पोलिसांना चांगल्या प्रतीचे रेफलेक्टर जॅकेट व रात्रीचे अंधारात ट्राफिक नियोजना साठी उपयोगी पडणारी LED बॅटन वितरित केली.

ह्या प्रसंगी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सर्व कर्मचाऱ्या तर्फे विवेक पारस कर ह्यांचे स्वागत करून त्यांनी वाहतूक पोलिसांसाठी घेतलेल्या पुढाकारा साठी त्यांचे आभार व्यक्त करून ह्या रेफलेक्टर जॅकेट व बॅटन चा वाहतूक पोलीस वाहतूक नियोजना साठी निश्चितच वापर करतील असे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here