मानापुर येथे पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण…

  • रस्ता चौडीकरणासाठी अतिक्रमण ठरत होते अडसर
  • सरपंच संदीप सावरकर यांचा पुढाकार

राजु कापसे
रामटेक

काल दि. २८ जानेवारीला तालुक्यातील तथा शहरापासुन अवघ्या २ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्रा.पं. मानापुर येथे ग्रामपंचायत प्रशाषणातर्फे रस्ता चौडीकरणाच्या उद्देशाने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशाषणाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

गट ग्रामपंचायत मानापुर अंतर्गत येत असलेल्या भोजापुर येथुन किट्स कॉलेजकडे रस्ता गेलेला आहे. मात्र रस्त्याच्या अरुंदतेमुळे वाहनांना रहदारीसाठी मोठा त्रास होत होता. शिवाय नागरीकांच्या सुद्धा या रस्त्याच्या अरुंदतेबाबद तक्रारी वाढल्या होत्या. तेव्हा ही समस्या हेरुन सरपंच संदीप सावरकर यांनी आमदार आशिष जयस्वाल यांचे सहकार्याने ग्रा.पं. प्रशाषणातर्फे अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारला व रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढुन रस्ता चौडीकरणाची समस्या मार्गी लावली.

ही कारवाई दि. २८ जाने. ला दुपारी १२ ते ४ दरम्यान करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशाषणाचे सहकार्य घेण्यात आले होते. यावेळी उपस्थितांमध्ये गट ग्रा.पं. मानापुर चे सरपंच संदीप सावरकर, उपसरपंच भारत अडकणे, सचिव निवृत्ती नेवारे, मंडळ अधिकारी जांभुळे, पि.एस.आय. बेंद्रे व पोलीस कर्मचारी, सदस्य राहुल वांढरे, आकाश चांदेकर, पुजा वाहाने, सपना हटवार, भारती आष्टणकर यांचेसह नागरीक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here