सुरळीत विजेसाठी अमरावती परिमंडलातील ४ हजाराहून अधिक कर्मचारी कर्तव्यावर…

अमरावती – कोरोनाच्या दुसऱ्या वेवच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड रूग्णालयासह सर्व  अत्यावशक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अमरावती परिमंडलात महावितरणचे सुमारे ४ हजार २५० हून अधिक अधिकारी ,अभियंते व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत.        

कोरोनाच्या दुसऱ्या वेवचे अवतार बघता मा.ऊर्जा मंत्री डाॅ.नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासकीय तसेच खाजगी रूग्णालये,कोव्हीडचे विशेष कक्ष,विलगीकरन कक्ष याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावशक सेवांना  अखंडित वीज पुरवठा मीळेल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतल्या जात आहे.या शिवाय अत्यावशक सेवेसाठी तत्काळ नविन वीज जोडणी देण्याची प्रक्रीयाही महावितरणकडून राबविली जात आहे.        

लॉकडाऊनमध्ये नागरीकांना घरी बसणे सुरळीत वीज पुरवठ्यामुळेच शक्य होत आहे.त्यातच आता दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत आहे.सर्वच नागरिक घरी असल्याने टिव्हीसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे.त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.      

अमरावती परिमंडलाअंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात महावितरणचे  ३७२ अभियंते,१९१६ जनमित्र, ६१९ यंत्रचालक,८४० बाह्यस्त्रोत कर्मचारी, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहे.यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्यासाठी व्यवस्थापनातील ५१० पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही आपली सेवा बजावत आहे.        

कोरोनाचे संकट बघता महावितरणचे कर्तव्य बजावतांना गेल्या वर्षभरात परिमंडलातील ३५३  कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.सध्यास्थितीत १४२ कर्मचारी हे कोरोना बाधित असून ०७ कर्मचाऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.तरीही महावितरण ग्राहकांच्या सेवेत आहे.वीज ग्राहकांनी कोरोना विरूध्दच्या या लढाईला सहजतेने न घेता मास्क,सामाजिक दुरीचे अंतर राखत  शासनांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here