महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे प्रकरणी १ मार्च २०२१ पासून होणारे बेमुदत धरणा …

अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास संघटनेने दिली तात्पुरती स्वरूपात स्थगिती…

नागपूर – शरद नागदेवे

वन विकास महामंडळ मधील कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करण्याकरीता महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी 1 मार्च 2021 पासून व्यवस्थापकीय संचालक तसेच महाव्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय तसेच विभागीय कार्यालयासमोर कर्मचारी संघटनेकडून बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्या करिता संघटनेकडून निवेदन देण्यात आलं होतं,

त्या अनुषंगाने एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक श्री एन. वासूदेवन भा.व.से. यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आज रोजी 25 मार्च ला व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात चर्चा करण्याकरिता बोलवले होते. सदर चर्चेला वनविकास महामंडळ अधिकारी,

कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा.अजय पाटील, कार्याध्यक्ष श्री बी.बी.पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, उपाध्यक्ष रवी रोटे, सचिव अशोक तूगीडवार इतर पदाधिकारी उपस्थित होते.सदर सभेत मा.व्यवस्थापकीय संचालक यांनी वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजुरी बाबत संचालक मंडळाच्या दिनांक 26.2.2019 रोजी ठराव संमत करण्यात आला आहे.

यामध्ये सातवा वेतन आयोग सुधारित वेतन संरचनामुळे येणारी दिनांक 1.1. 2016 ते 31.12.2020 पर्यंत ची थकबाकी आस्थापना खर्च अंदाजे 25 कोटी रुपये नियोजनाच्या दृष्टीने सन 20/21 आर्थिक वर्षात सामाविष्ट करुन देयतेचे शोधन समान तीन त्रैमासिक हप्त्यात देण्याची तरतूद करून ठेवली आहे. सदर प्रकरण हे शासन स्तरावर प्रलंबित आहे तसेच सदर प्रकरण लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.

शासन स्तरावरून सातवा वेतन आयोग मंजूर होताच लगेच कर्मचाऱ्यांना देण्याबाबतची प्रक्रिया करू असे आश्वासन दिले व व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा करणे सुरु आहे.श्री एन.वासुदेवन यांनी व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारल्यापासून संघटनेने मागणी केलेल्या कर्मचार्‍याच्या अनेक प्रलंबित मागण्या निकाली काढल्या आहेत तसेच यापुढेही कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या निकाली काढू असे आश्वासन दिले.

तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग बाबतचे प्रकरण लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली व संघटनेने पुकारलेले अन्नत्याग/ सत्याग्रह आंदोलन सध्या तरी स्थगित करावा अशी विनंती केली. सध्या राज्यामध्ये कोरोणाचा प्रादूर्भाव असल्यामुळे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व राजकीय,सामाजिक, धार्मिक तसेच गर्दी करणारी आंदोलने करण्यात येऊ नये असे आवाहन केले आहे.

त्यास अनुसरून कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आरोग्याच्या दृष्टीने वन विकास महामंडळ अधिकारी ,कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने दिलेल्या आश्वासनामुळे 1 मार्च 2021 पासून होणारे बेमुदत धरणा कार्यक्रम,

अन्नत्याग सत्याग्रह तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले असून तशी माहिती मा.व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आली. सदर आंदोलन स्थगित केल्यामुळे एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक श्री एन. वासुदेवन यांनी संघटना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले तसेच संघटनेकडून माननीय एस. वासुदेवन यांचे आभार मानले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here