कशी चालणार महावितरण! वीज ग्राहकांनी विचार करावा; मुख्य अभियंताचे नंम्र आवाहन…

महावितरणची आर्थीक परिस्थिती वाईट – परिमंडलाची थकबाकी २९३ कोटीवर…
वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन…

अमरावती – गेल्या वर्षभरात महावितरणने केवळ अखंडित सेवा दिली,काळ वाईट होता याची जान होती म्हणूनच महावितरणकडून वीजबिल भरण्याचा कोणताच तगादा लावला नाही, परिणामी या काळात  वाढलेल्या थकबाकीने महावितरणसमोर थेट अस्तीत्वाचेच संकट निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत वीज ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा केला नाही तर ,महावितरण चालणार कशी ! याबाबत ग्राहकांनीच विचार करावा आणि थकित वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे नंम्र आवाहन महावितरण अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.

अमरावती परिमंडलात गेल्या वर्षभरात घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारितीलच ५ लक्ष ४० हजार ग्राहकांकडे २९३ कोटी ६५ लक्ष रूपयाची वीज बिलाची थकबाकी आहे.एवढेच नाही तर परिमंडलातील १ लक्ष ७९ हजार ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीज बिल न भरल्याने त्यांच्याकडे वीज बिलाचे १४५ कोटी ५४ लक्ष रूपये थकले आहे. मग अशा परिस्थितीत ग्राहकांनी खरच वीज बिल भरू नये का? महावितरणचा वीज ग्राहकांना एक साधा प्रश्न.

कोरोना काळात सर्वांना आर्थीक अडचणीतून जावे लागले या परिस्थितीची महावितरणला जाण होतीच ,म्हणून तर ग्राहकांना आपल्या वीजबिलाचे टप्याने भरण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली. वीज ग्राहकांना याचीही जान असावी की,महावितरणही वीज ग्राहकांप्रमाणे वीज निर्मीती कंपन्यांची एक ग्राहकच आहे.

त्यामुळे वीज निर्मीती कंपनीकडून वीज खरेदी करणे, दिवस रात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार देणे ,प्रशासन चालविणे आदी गोष्टीही आल्याच, महावितरणच्या एकून वीजबिलाच्या रकमेपैकी जवळपास ८५ टक्के खर्च हा निवळ वीज खरेदीवर होतो आणि १५ टक्यात पगारापासून तर इतर सर्व प्रशासकीय खर्च करण्यात येतो.

 त्यामुळे विचार करण्यासारखे आहे की,वसूलीच झाली नाही तर महावितरणचा व्यवहार चालणार कसा?  त्यामुळे  परिमंडलातील वीज ग्राहकांनी कोणत्याही भुलथापांना बळी  पडू नये,  स्वत: विचार करावा आणि पटत असेल तर आपल्या जवळच्यांनाही वीजबिल भरण्यास आग्रह धरावा आणि महावितरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे नंम्र आवाहन महावितरण अमरावती परिमंडलाच्या वतीने करण्यात येत आहे.

जनसंपर्क अधिकारी
महावितरण अमरावती परिमंडल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here