खेड तालुक्यातील विजबिलांच्या तक्रारींची दखल घ्या- अन्यथा तीव्र आंदोलन,खेड तालुका मनसेचा इशारा…

राजगुरूनगर ( पुणे ) : कोरोना मूळे गेली पाच सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत.या काळात अनेक जण बेरोजगार झाले,असंख्य छोटे मोठे व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत तर शेतकऱ्यांची अवस्था मोठी दयनीय झाली आहे.वाढीव रकमेच्या वीज बिलांमुळे वीज मंडळाच्या गलथानपणाचा फटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे.

खेड तालुक्यातील असंख्य वीज ग्राहकांच्या तक्रारी तालुका मनसेकडे आल्या असल्याने लॉकडाऊनच्या काळातील विजबिले त्वरित कमी करावीत,विजबिले दुरुस्ती करून मिळावीत,रीडिंग प्रमाणे महिन्यानुसार बिले मिळावीत यासाठी मनसेच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात केलेल्या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी दिला आहे.यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, खेड तालुका सचिव नितीन ताठे, खेड तालुका उपाध्यक्ष सोपान डुंबरे, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सुनील साळवी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here