किशोर वयातच अभियांत्रिकी, होम सायन्स, शेती तंत्रज्ञान व इलेक्ट्रिकल प्रशिक्षण देणारी एकमेव प्रशाला नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम…

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाऊंडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/गुरुकुल शाळेमध्ये आज गुरुवार दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 रोजी खंडेनवमी निमित्त मल्टी स्किल विभागांमध्ये असणाऱ्या विविध साहित्यांचे पूजन ,नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याहेतूने शाळेने सन 2017 पासून मल्टि स्किल फौंडेशन कोर्स ची सुरवात केली.यामधून विद्यार्थाना शेती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण,अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान इत्यादी विषयांची प्रात्यक्षिके घेतली जातात. शेती तंत्रज्ञान विभागांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या कामाचे ज्ञान अवगत व्हावे या हेतूने बागकाम तंत्रज्ञान, रोपवाटिका तंत्रज्ञान ,सेंद्रिय खत तयार करणे ,शेतीच्या मशागतीची कामे करणे, भाजीपाला लागवड इत्यादीचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.

अभियांत्रिकी विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना वेल्डिंग करणे , दैनंदिन जीवनात लागणाऱ्या घरगुती वस्तू उदाहरणार्थ टेबल-खुर्च्या , पाट तयार करणे ,तसेच बांधकामाचे प्राथमिक ज्ञान प्रत्यक्ष कृतीद्वारे दिले जाते.ऊर्जा आणि पर्यावरण या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल साहीत्य माहिती व हाताळणी, सर्किट तयार करणे, अर्थिंग विषयी माहिती, हाउस वायरिंग विषयी प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.

अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती, संतुलित आहार, पदार्थातील भेसळ ओळखणे, केक, लोणची, विविध प्रकारच्या चटण्या तयार करणे, त्याचबरोबर तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे लेबलिंग व पॅकिंग करणे इत्यादीचे ज्ञान दिले जाते याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअर निवडीसाठी होतो.

या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या घरी स्वतः फॅन दुरुस्ती करणे, फॅन बसवणे, फ्यूज दुरुस्ती करणे, सर्किट चेक करणे, तसेच घरगुती खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे. सुपल्या, विळती, कुंड्या तयार करून त्याची विक्री केलेली आहे. अशाप्रकारे आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बहुविध कौशल्याधिष्ठित या कोर्समधून अभ्यासाबरोबरच भविष्यामध्ये लघुउद्योग त्यांना सुरु करता येईल एवढे ज्ञान प्राप्त केलेले आहे असे दिसून येते

कोरोना कालावधीनंतर प्रथमच शाळा या ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे सुरू आहे. आज खंडे नवमी निमित्त विद्यार्थ्यांना विविध साहित्य साधनांची माहिती देण्यात आली तसेच सण व संस्कृतीचे दर्शन देण्यात आले.

इयत्ता आठवीपासून हा कोर्स विद्यार्थ्यांना शिकवला जातो. संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रवीण शेठ लुंकड, सचिव एन जी कामत सर, मुख्याध्यापक श्री अधिक्राव पवार सर, संस्थेच्या एचआर मॅनेजर सौ गीतांजली पाटील देशमुख मॅडम, मल्टी स्किल कोर्स चे प्रमुख श्री अनिरुद्ध बनसोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स सुरू आहे.

याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर , समन्वयक श्रीअनिरुद्ध पाटील सर, निदेशक विलास राठोड सर,रेणुका पांगम,सागर नंदिवाले,सुफीयान नदाफ सर.. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here