रिपाई(आ)कामगार पाठपुराव्याला यश…

कोल्हापुर – राजेद्र ढाले

उचगाव (ता.करवीर)येथील बांधकाम कामगार अशोक पवार याचा 1 जुन 2020 रोजी कोल्हापुर विमानतळ येथे बांधकामावर काम करीत असतांना इलेक्ट्रीक शाँक लागुन जागीच मुत्यू झाला होता.त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते.

त्यांना शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाकडुन मदत मिळावी यासाठी रिपाई कामगार आघाडीच्या वतीने प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी विशेष प्रयत्न करुण त्यांना पाच लाख रुपये मदत मिळवुन दिली त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात चेक कामगार मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व रिपाई (आ.गट) चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवार यांच्या कुटुबियांना देण्यात आला.

अशोक पवार हे बांधकाम कामगार कल्यानकारी मडंळाचे नोंदीत बांधकाम कामगार होते तसेच ते रिपाई (आ.गट) चे बांधकाम कामगार आघाडीचे सभासद होते .ते काम करीत असतांना इलेक्ट्रीक शाॅक लागुन 1 जुन 2020 रोजी मुत्यू झाला .त्यावेळी कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटनिस गुणवंत नागटीळे व शहरध्यक्ष प्रदिप मस्के यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देवुन संबधित एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याशी सपंर्क करुण पचंनामा करुण घेवुन कल्याणकारी मडंळाकडे लाभासाठी अर्ज केला.

त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांच्या कुंटुबांना यापुर्वी अंत्यसंस्कारासाठी दाहा हाजार रुपये व मयत कामगाराच्या वारसांना 24 हाजार रुपये मिळाले आहेत.तसेच बांधकाम कामगाराना त्यांच्यामुत्यू नतर शासनाच्या बांधकाम कल्याणकारी मडंळाकडुन मिळणाऱ्या मदतीसाठी पाठपुरावा केला. त्यासाठी वारसा सिद्ध करण्यापासून लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून सहाय्यक आयुक्त कार्यालय मुंबई मंडळाकडे गेले वर्षभर पाठपुरावा केला त्यांनी केलेल्या प्रयत्नातून त्यांना पाच लाख रुपये मंजूर झाले.

मयत अशोक पवार यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे त्यात तर त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे शासनाकडून मिळालेल्या या मदतीने त्यांच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे ती मदत मिळवून देण्यासाठी रिपाई(आ.गट) कामगार आघाडीचे गुणवंत नागटीळे याने केलेला प्रयत्न पवार कुटुंबांसाठी मोठा आधार देणार आहे रिपाई(आ.गट) कामगार आघाडी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असून अनेक कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे.

त्यामुळे कामगार आकडे विषय बांधकाम कामगार वर्गामध्ये एक अस्था निर्माण झाली आहे.यावेळी शहराध्यक्ष प्रदीप मस्के अध्यक्ष कृष्णा लोखंडे उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण रवींद्र पाटील बांधकाम कामगार व रिपाइं पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here