नांदेड जिल्ह्यातील तीन नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर…

२१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबरला मतमोजणी…

बिलोली – रत्नाकर जाधव

राज्यातील मुदत संपलेल्या १०५ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून. दि. २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यात नायगाव,माहूर नगरपंचायतचाही समावेश असून. नायगाव नगरपंचायतची मुदत दि. २४ जानेवारी २०२१ रोजी संपली आहे सध्या प्रशासकाच्या हाती कारभार आहे. निवडणुकांच्या घोषणा झाल्याने आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ मध्ये मुदत संपलेल्या व संपणार असलेल्या १०५ नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी केली आहे. यात नायगाव नगरपंचायतचा समावेश आहे. नायगाव नगरपंचायतची जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपली असून दि. १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आणि सर्वसाधारण महिलाचे सुधारित आरक्षण काढण्यात आले.

१७ सदस्य असलेल्या नायगाव नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती साठी ४, अनुसूचित जमाती १, नागरिकांचा मागास प्रवर्ग ३ आणि सर्वसाधारणसाठी ९ प्रभाग आरक्षित झाले आहेत.निवडणुकांची आज घोषणा झाल्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here