मूर्तिजापुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्यकरिणीची निवड…

संकट काळात राष्ट्रवादी ओबीसी सेल नागरिकांच्या पाठीशी-विष्णु लोडम.

मूर्तिजापुर – स्थानिक प्रतिभावंत नगर येथे दी,28 सोमवार रोजी सम्पन्न झालेल्या सभेत सोशल डीस्टसिंग चे पूर्णपणे पालन करुण झालेल्या मीटिंग मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम भय्या गावंडे यांचे वाढदिवसाचे अवचीत्य साधुनओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी सेल तालुकााध्यक्ष विष्णु लोडम यांनी नवीन कार्यकरिणी जाहिर केली.

यामध्ये योगेश ठाकरे व गजानन सावरकर यांना ओबीसी तालुका उपाध्यक्ष वकार चाऊस यांना संघटक तर आरखेड शाखा अध्यक्ष पदी शिरीष लोडम, व नारायण मते यांची शाखा उपाध्यक्ष, प्रसिद्धि प्रमुख पदी अमर सोनेकर ,हातगव सर्कल प्रमुख म्हणून महेंद्र बोळे यांना नियुक्त करण्यात आले.

कोरोना मूळे आलेले आर्थिक संकट व इतर समस्या बाबत चर्चा करण्यात आली व या संकट काळात राष्ट्रवादी ओबीसी सेल नागरिकांच्या पाठीशी असल्याचे तसेच ओबीसी घटकांचे प्रश्न सोडविन्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन विष्णु लोडम यांनी केले.

पक्ष बांधनी करिता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यानि जवाबदारिने कार्य करण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी साहित्य कला संस्कृतिक मंडळ चे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्री शाम कोल्हाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर शहर अध्यक्ष राम कोरडे,

रॉ कॉ युवक जिल्हा उपाध्यक्ष अमोल लोकरे, समाजसेवक रवि राठी,अमर पाटिल ठाकरे,अतुल गावंडे,विशाल शिरभाते, श्री काम्बे, निखिल ठाकरे ,डॉ, राहिल चाऊस,आनंद पवार, प्रवीण पाटिल खोत सरपंच सिरसो इत्यादि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here