बडनेरा शहरातील सार्वजनिक सौचालयामध्ये एक वृध्द स्त्री गेली असता सौचालयाची सीट तुटून टाक्यामध्ये पडली…

प्रहार जनशक्ती पक्ष, बडनेरा शहर यांचे बडनेरा म.न.पा. सहाय्यक आयुक्त यांना निवेदन…

स्थानिक ,बडनेरा स्थित शिवाजी नगर हमालपुरा,नवीवस्ती,बडनेरा येथे दिनांक 31/01/2021 वेळ सकाळी 6:30 च्या सुमारास एक वृद्ध स्त्री सौचालय मध्ये गेली असता काही वेळाने ती सौचालयाची सीट तुटून गेली आणि ती वृद्ध स्त्री त्या सौचालयाचा टाक्यामध्ये पडली,

नागरीकांनच्या सतर्कतेमुळे त्या वृद्ध महिलाला वाचविणे शक्य ठरले व ती वृद्ध स्त्री वाचली.गेली 30 ते 40 वर्षांपासून बडनेरा शहरातील बरीच सौचालय बांधली गेली आहे.तसेच त्या सौचालये शिकस्त बांधकामावर म.न.पा.प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

तसेच बडनेरातील जुनीवस्ती व नविवस्ती येथे सुध्या जुनी सौचालये आहे..त्यामुळे ती सौचालयाची पाहणी करून ती सौचालय पुन्हा बांधान्यात यावी..व घडलेला प्रकारावर संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाही करण्यात यावी.या प्रकारचा जीवघेणे प्रकार प्रहार जनशक्ती पक्ष,बडनेरा शहर खपवून घेणार नाही.

सदर प्रकरणावर 2 ते 3 दिवसात कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष,बडनेरा शहर तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे. त्याक्षणी बडनेरा म.न.पा.सहाय्यक आयुक्त सौ.मोटघरे मॅडम यांना शहर अध्यक्ष योगेश कावरे,उपाध्यक्ष महेश पवार,उपाध्यक्ष तुषार महोरे,शाखा अध्यक्ष गौरव ढेरे. व इतर कार्यकर्ते यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here