जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे,होणार का? राष्ट्रवादी चा जल सिंधू!

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

मुक्ताईनगर मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या बातम्या प्रसार माध्यमे, टिव्ही चॅनल, व्हाट्सएप, फेसबुक च्या माध्यमातून जोरदार चर्चा सुरू असून कोणी म्हणत होते की,

१० ऑक्टोबर ला घड्याळ बांधणार,कोणी म्हणते विजया दशमीच्या मुहूर्तावर बांधणार अशी चर्चा सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यां मध्ये सुरूआहे,परन्तु जो नेता स्वतः च्या हिंमतीने स्वकर्तृत्वावर सेंद्रिय नेता म्हणून राज्याच्या राजकारणात विविध क्षेत्रात ठसा उमटवतो,

अशा son of soil भूमीपुत्राच्या बुद्धीचा थांगपत्ताही न लागणे हा विषय राजकीय विश्लेषक सह पक्ष श्रेष्ठी च्या भुवया उंचवणार विषय आहे, एकनाथ खडसे यांना विरोधी पक्षात असतांना, भाजप पक्ष सोडून सत्ताधारी पक्षाचे नेते निमंत्रण येत होते, मुख्यमंत्री पासून ते शरद पवार यांच्या पर्यंत पक्ष निमंत्रण दिले,

Page Latest marathi news, breaking marathi news

” संधीचे सोनं करा”हवे ते खाते देण्याची तयारी दर्शवली ,परंतु नाथा भाऊंनी “या माऊली शी गद्दारी करणार नाही”पक्ष सोडणे हा द्रोह ठरेल,”कधी सत्ता असते,तर कधी नसते,”सत्तेत बदल होत च असतात काय सांगावे उद्या आमची सत्ता येईल,असे एकनाथ खडसे यांनी2005 मध्ये म्हटले होते,

2014 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सेना युतीला बहुमत मिळाले,राजकीय संकेतानुसार ज्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता हा मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो,परन्तु एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत पक्ष श्रेष्टींनी राजकिय संकेत न पळता एकही आमदारांचा पाठिंबा नसलेल्या,

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत किंवा चर्चेत नसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, भारतीय जनता पक्षाच्या 122 आमदार पैकी 48 ओ बी सी 19,मराठा,19 अनुसूचित जाती चे,6 अनुसुचित जमातीचे,व 27खुल्या गटाचे आमदार असतांना बहुजन समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायला हवी होती, भारतीय जनता जेष्ठता ,अनुभव ,व बहुजनांचे नेते खडसे मुख्यमंत्री हवे होते,

मुख्यमंत्री पदाची संधी जरी मिळाली नसली तरी खडसे यांना 12 खात्याचें मंत्री पदे दिले ,पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरात महाराष्ट्र शासना तर्फे अग्र पुजेचा मान सत्तेत आल्यानंतर पहिल्या आषाढी एकादशीला नाथाभाऊंना देण्यात आला, राजकारणात सत्ता स्पर्धेत टिकण्यासाठी व्यक्तित्व ही अनेक गुणांची शिदोरी असली तरी सत्ता सोपान परंपरेत टिकण्यासाठी कोणाचा तरी वरदहस्त हवा असतो,

कोणीतरी आशिर्वाद देणारा(god father)लागतो,ती उणीव त्यांच्या आयुष्यात राहिलीम्हणून की काय?मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा दावेदार असलेला हा नेता त्या संधील पारखा झाला,की काय,?एकंदरीत काँग्रेस ने जसा धुळ्याचे रोहिदास पाटील माजी मंत्री,

यांच्यावर अन्याय केला तसाच अन्याय भारतीय जनता पक्षाने खान्देश च्या भूमी पूत्र तथा सेंद्रिय नेते एकनाथराव खडसे यांच्या वर केला आहे,या वरून असे दिसून येते की बहुजन समाजातील काँग्रेस असो की भारतीय जनता पक्ष एकाच माळेचे मणी आहेत,हे बहुजनांनी लक्षात घावे,जेव्हा पक्ष खड्यासारखा बाजूला पसवरतो तेव्हा नेत्यांच्या डोळ्यावरील पक्ष निष्ठतेची पट्टी गळून पडते ,मग बहुजन शब्दाची आठवण होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here