एकनाथ खडसे यांची प्रकृती पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच खालावली…

फाईल फोटो

न्यूज डेस्क – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची आज अचानक तब्बेत खराब झाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत Twitter हंड्ल वरून देण्यात आली आहे. त्यापूर्वी ते आज पत्रकार परीशाध घेणार होते मात्र आता ती रद्द करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी कडून कळविण्यात आले.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आली आहे. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज होणारी खडसे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. त्यामुळे या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. या प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here