एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवरील केलेले आरोप चुकीचे ‌‌- अजय पाटील…

नागपूर – शरद नागदेवे

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षातून राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे ज्वेष्ठ नेते अजय पाटील यांनी व्यक्त कले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बहुजन नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे पश्र्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेसचे वर्चस्व असतांना.देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने संभाजी राजे,उदय राजे, प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदत भोसले यांच्या सारखे बहुजन समाजाचे दिग्गज नेते भाजपात आले.

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर बहुजन समाजातील नेते व कार्यकर्ते पक्षापासून दुर जातील असे भासविण्याचा प्रयत्न होत आहे.परंतू अशी वास्तविकता नाही.राजकारणात स्व:ताच्या बचावासाठी इतरांना दोष देणे चुकीचे आहे. असे अजय पाटील यांनी मत व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा, विदर्भ येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले ,याला नाकारता येत नाही.असे अजय पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here