कुडेगाव येथे ‘एक गाव एक गणपती”…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

बाल गणेश उत्सव मंडळ व गावक-यांच्या वतीने तालुक्यातील कुडेगाव एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आलू आहे.सदर स्थापना गत 22ऑगष्ट रोजी येथील सार्वजनीक हनुमान मंदीर देवस्थानात करण्यात आली आहे.

दरवर्षी उत्साहात आजारा करण्यात येणारा हा उत्सव यावर्षी कोरोना परिस्थितीत अगदी साधेपणाने व शासन निर्देशाचे पालनात किमान मंडळ पदाधिका-यांच्या उपस्थितीत पुजा अर्चना करुन साजरा केला जात आहे.

दरम्यान या उत्सव काळात शासन निर्देशाचे उल्लंघन होणार नाही यासाठी मंडळाचे अध्यक्ष योगेंद्र ब्राम्हनकर,उपाध्यक्ष राजेंद्र कांबळी ,सदस्य मधुसूदन राऊत,ग्रा.प.सदस्य कुंजिलाल उप्रिकर यासह अन्य पदाधिकारी व गावकरी नियमित कर्तव्य दक्ष असल्याची माहिती देण्यात आली.सदर उपक्रमाचे तालुक्यातील जनतेत कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here