खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार !…

फोटो- फाईल फोटो

न्यूज डेस्क – डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा कल्याण शहरातून एक धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना घडली असून एका शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिकवणीसाठी येणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्याण पश्चिम परिसरात आरोपी शिक्षक आणि त्याची पत्नी हा खासगी शिकवणी घेतो. त्याच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर शिक्षकेच्या पतीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही शिक्षिका काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने तिचा पती सर्व विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. याच दरम्यान त्याने 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर एक दिवस चिमुकलीने शिकवणीसाठी जाण्यास नकार दिला आणि रडण्यास सुरुवात केली. यावेळी तिला पालकांनी विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुदर तालवाला याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कल्यामधील बाजारपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here