नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना ८ लाखांची लाच घेताना अटक…

एका संस्थेकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे…….

न्यूज डेस्क – विनानुदानित शाळांना मंजूर करण्यात आलेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांच्यासह शासकीय वाहनचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी ९ लाख रुपयांची मागणी केली होती. पण तडजोडीनंतर आठ लाख रुपये देण्याचं ठरलं होतं.

यानंतर संबंधित संस्थाचालकानं याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लाचलुचपत विभागानं तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर, सापळा रचून आरोपी शिक्षणाधिकाऱ्याच्या वाहन चालकाला अटक केली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here