अजित पवारांच्या नातेवाईकाच्या जरंडेश्वर शुगर्स कारखान्यावर जप्तीची ईडीने केली कारवाई…

न्यूज डेस्क – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांची साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वार शुगर्स या कारखान्याच्या ६६ कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर जप्ती आणण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्राकडून देण्यात आली. जरंडेश्वार सहकारी कारखाना २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला होता. तेव्हा समर्पित किमतीपेक्षा कमी दराने हा कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली.

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील रकमेतून हा कारखाना अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने आपल्या ताब्यात घेतला होता. त्या विरोधात ईडीने कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीने कमी दरात खरेदी केलेल्या सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here