पालघर जिल्ह्यात भूकंपाचं सत्र सुरूच,शुक्रवारी रात्री लागोपाठ भूकंपाचे तीन धक्के…

पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक गावं शुक्रवारी (ता.04) रात्री लागोपाठ तीन भूकंपाच्या धक्क्याने हादरली. शुक्रवारी रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8 रिष्टर स्केलच्या भूकंपाचा पहिला धक्का बसला.

त्यानंतर 11 वाजून 41 मिनिटांनी 4.0 रिष्टर स्केलचा आणि 12 वाजून 05 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केलचा तिसरा धक्का बसला. लागोपाठ भूकंपाचे तीन धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

शुक्रवारी उशिरा रात्री आलेल्या भूकंपाचे हादरे डहाणू, दापचरी,धुंदलवाडी,वंकास,बोर्डी,झाई घोलवड, तलासरी, वडवली, उपलाट ,कवाडा,वरवाडा या भागासह परिसरासह गुजरात राज्यातील उंबरगाव,वापी आणि केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या सिल्वासा परिसरापर्यंत जाणवले.पावसाळ्यात भूकंपाचे धक्के बंद झाले होते.गेल्या पंधरा दिवसांपासून भूकंपाचे धक्के पुन्हा बसण्या सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत.शासकीय पातळीवर भूकंपाची करणे शोधण्यासाठी भूगर्भीय अभ्यास सुरू आहे.सतत होत असल्याने भूकंपामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here