लॉकडाऊन काळातही शिक्षणाची गाडीची सुरूच; कसबेपाडा शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षकांचा श्रमजीवी संघटनेकडून सत्कार…

त्र्यंबकेश्वर – श्रमजीवी संघटनेच्या त्र्यंबकेश्वर तालूका संवाद दौऱ्या मध्ये तालुक्यातील संघटनेमार्फत सुरू असलेल्या अभ्यासवर्ग भेटीचा योग आला. वाघेरे गावातील कसबेपाडा जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात गेल्यावर खरंच मन प्रसन्न झाले.

या शाळेची अनोखी रंगरंगोटी ,शाळेला शिक्षणाच्या गाडीचे स्वरून देऊन शिक्षकांनी आपल्या कल्पकतेने शाळेचे नंदनवन केलेय. लॉकडाऊन काळातही शाळेत येणारे, क्लास घेणारे, गृहभेटी देऊन गृहपाठ देणारे बोटावर मोजण्याइतके शिक्षक आहेत.

त्यातीलच शिक्षक श्री संजय बदादे आणि शिक्षिका श्रीम. चव्हाण हे होत. या शाळेच्या पटांगणात मुलांचे खेळ घेतले, यावेळी शिक्षक श्री संजय बदादे व शिक्षिका श्रीम. चव्हाण यांचा संघटनेच्या गावकमेटी मार्फत सन्मान करून आभार मानले.

कसबेपाडा या शाळेत 56 पट आहे, पैकी फक्त 10 पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, ऑनलाइन शक्यच नाही,म्हणून शिक्षकांनी 2 तासाचे क्लास सुरू केलेले, मधल्या काळात या भागात कोरोना संसर्ग वाढल्यानं ते बंद झाले, पण आताही शिक्षक रोज गृहभेटी देऊन अभ्यास देऊन पाठपुरावा घेत असतात.

शाळेची स्थिती अतिशय उत्कृष्ट असून सर्व मुलांना बेंच आहेत. ते ही एका दानशूर दात्याकडून मिळवले आहेत. एकुण काम पाहता त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
संघटना गावकमिटी प्रमुख जयराम बदादे आता अभ्यासवर्ग घेत आहेत.

यावेळी गावकमेटी प्रमुख जयराम बदादे, हिराताई बदादे, उपप्रमुख देवराम निपळूनगे, सचिव उत्तम बदादे, गोविंद नारूळे, आणि पदाधिकारी होते. सोबत संवाद दौऱ्यातील सहकारी फ्रान्सिस भाऊ, जया ताई, किसन भाऊ, नवनाथ भाऊ, नीता ताई, भगवान डोखे, तानाजी शिद,सुनील वाघ, सुरेश पुंजारे, नामदेव बांगारे आदी मानयवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here