कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांचा पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास…

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांचा पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण मोहन पाटील हे मूळचे रहिवासी सातारा येथील असुन त्यांचा जन्म 5 एप्रिल 1979 साली झाला असुन त्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये असल्याने त्यांचे बालपण पोलीस लाईन मध्येच गेले. त्याठिकाणी ते लहानाचे मोठे होऊन त्यांनी बीएससी केमिस्ट्री या विषयांमध्ये पदवीधर शिक्षण घेतले. वडील पोलीस सेवेत कर्मचारी म्हणून नोकरी करतात हे ते लहानपणापासुन पाहत होते.

त्यांचे वडील नेहमी त्यांना म्हणायचे तु पोलीस खात्यामध्ये येऊ नकोस. पदवीधर आहेस ,उच्चशिक्षित आहेस दुसरी कोणतीही नोकरी शोध.परंतु वडिलांचं पोलीस सेवेतील शिस्त. त्यामुळेच त्यांना पोलीस खात्याविषयी आवड निर्माण झाली होती. आजोबा व चुलते हेदेखील पोलीस खात्यामध्ये होते.त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पोलीस खात्याच्या अनुषंगानेच वातावरण होते.

मात्र घरातील कोणीही पोलीस अधिकारी नसल्यामुळे त्यांना असे नेहमी वाटायचं की आपण पोलीस खात्यामध्ये गेलो तर अधिकारी म्हणूनच नोकरी करायची असा निश्चय केला होता. त्या प्रमाणे ते पदवीधर शिक्षण झाल्यानंतर mpsc कडे वळाले. ते करत असतानाच 2003 मध्ये पोलीस शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झाले. पण त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते.

पोलीस कर्मचारी म्हणून पोलीस दलात काम करत असताना त्यांच्या वडिलांनी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत नोकरी केली होती. त्याच्यासोबत नोकरी करण्याचा त्यांना योग आला. त्यातूनच ते 2010 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झाले.आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

त्यानंतर प्रथमच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सोलापूर शहर येथे कर्तव्य बजावले.त्याचबरोबर अँटी करप्शन ब्युरो(एसीबी) कोल्हापूर,त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी पोलीस स्टेशन येथे प्रभारी म्हणून काम पाहिले. covid-19 च्या काळातही त्यांनी कोरोणा योद्धा म्हणून या अनुषंगाने कामकाज केले.

पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व त्यानंतर प्रभारी म्हणून गोकुळ शिरगाव येथे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे.आतापर्यत 18 वर्ष सेवा बजावली असुन त्यांची आता पोलीस निरिक्षक म्हणून बढती मिळाल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेकडून शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here