पोर्टल बंद पडल्याने आधारभूत केंद्रावरील धान खरेदी ठप्प…उन्हाळी धान उत्पादकांत तीव्र असंतोष…केंद्राना मुदतवाढ देण्याची मागणी

नास्तिक लांडगे,लाखांदूर

लाखांदूर:- उन्हाळी धान हंगामात लाखांदूर तालुक्यात अर्धे हंगाम लोटल्यानंतर उशिरा आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. शासनाने सदर केंद्र येत्या 30 जून पर्यंत चालू ठेवून धान्य खरेदी करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासन मुदतीच्या एक दिवस आधीच खरेदी केंद्राचे पोर्टल बंद पाडल्याने सर्व आधारभूत केंद्रावरील धान खरेदी ठप्प झाली आहे.

सदरच्या घटनेने संतापलेल्या उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ पोर्टल चालू करून आधारभूत केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात मागील पंधरवड्यापूर्वी पासून टप्प्याटप्प्याने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

तालुक्यातील खरेदी विक्री सहकारी संस्था व देवी जय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था अंतर्गत तालुक्यात उन्हाळी धान खरेदी केंद्र चालू करण्यात आले. सदरचे केंद्र उन्हाळी धानाचे अर्ध्याहून अधिक हंगाम उरकल्यानंतर उशिरा चालू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनीआधारभूत धान खरेदी केंद्रावर एकच गर्दी केली होती.

सदर केंद्रावर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान मोजमापाचा शिवाय उघड्यावर पडलेले दिसून येत आहेत. शासनाने संबंधित केंद्रांना केवळ 30 जून पर्यंत धान खरेदी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र उशिरा आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानाची केंद्रांतर्गत अद्यापही खरेदी झालेली नाही.

आतापर्यंत लाखांदूर तालुक्यातील विजय लक्ष्मी राईस मिल संस्था व खरेदी विक्री संस्था अंतर्गत जवळपास तीस हजार क्विंटल धानाची खरेदी झाल्याची माहिती आहे. खुल्या बाजारात उन्हाळी धानाला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्राकडे धाव घेतली असून सद्यस्थितीत खरेदी झालेल्या पानापेक्षा जवळपास दहा पट खरेदी शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या संबंधाने अधिक माहिती घेतली असता शासनाने धान खरेदी केंद्रांचे पोर्टल बंद पडल्यामुळे नव्याने खरेदी करताना शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देणे कठीण होणार असल्यामुळे तालुक्‍यातील सर्वच आधारभूत केंद्र बंद ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान उशिरा धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी करताना उघड्यावर धान पोती असल्याने व केंद्र बंद पडल्याने पावसात भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती बळावली आहे.

शासनाने केवळ 30 जून पर्यंत केंद्र चालविण्याची मुदत देतांना एक दिवस आधीच पोर्टल बंद पडल्याने तसेही शेतकऱ्यात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन बंद पाडण्यात आले धान खरेदी केंद्राचे पोर्टल पूर्ववत सुरू करून आधारभूत केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here