मराठवाडा एक्स्प्रेस लाईन ब्लॉक मुळे चार दिवस औरंगाबाद- मनमाड-औरंगाबाद दरम्यान अंशतः रद्द…

महेंद्र गायकवाड
नांदेड
रेल्वे पटरी चे नवीनीकरण करण्या करिता दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी हे चार दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्य महत्वपूर्ण आहे.
या लाईन ब्लॉकमुळे मराठवाडा एक्स्प्रेस वरील चार दिवस औरंगाबाद-मनमाड-औरंगाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

ती पुढील प्रमाणे —
१. गाडी संख्या 17688 धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी, 2022 हे चार दिवस औरंगाबाद ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हि गाडी धर्माबाद-औरंगाबाद दरम्यान तिच्या नियमित वेळे नुसार धावेल.

२. गाडी संख्या 17687 मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी, 2022 हे चार दिवस मनमाड ते औरंगाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हि गाडी औरंगाबाद ते धर्माबाद दरम्यान तिच्या नियमित वेळे नुसार धावेल.

३. तसेच गाडी संख्या 17617 / 17618 नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी, 2022 हे चार मनमाड ते लासूर दरम्यान 10 मिनिटे उशिरा धावेल. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय
नांदेड यांच्या कडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here