कोव्हिडवर मात करण्यासाठी ड्रूमद्वारे १ कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा…

मुंबई, ६ मे २०२१: सध्याच्या अनिश्चितेच्या काळात एक जबाबदार कंपनी या नात्याने, ड्रूम या भारतातील सर्वात मोठ्या आणि आघाडीची एआय आधारीत ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटप्लेस असलेल्या कंपनीने ड्रूम केअर्स या बॅनरखाली कर्मचारी आणि डीलर्स समूहासाठी कोव्हिडवर मात करण्याकरिता १ कोटी रुपये बजेट जाहीर केले आहे.

कंपनीचे कर्मचारी, संपूर्ण डीलर्स समूह आणि स्टेक होल्डर्स यांच्या कल्याणाकरिता कंपनीने सुरु केलेला उपक्रम म्हणजे ड्रूम केअर्स. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना ५ पट विमा कवच, मूलभूत वैद्यकीय सुविधायुक्त इमर्जन्सी वॉर्ड, जर्म शील्डचा वापर करत फ्रंटलाइन वर्कर्ससाठी सॅनिटायझेशन सेवा, ऑटोमोबाइल डीलर्ससाठी आयसोलेशन वॉर्ड आदी सुविधांचा समावेश आहे.  

या काळात सर्वाधिक फटका बसलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना मदतीचा हात देत ड्रूमने २०,५०० पेक्षा जास्त डीलर्ससाठी प्रोग्राम लाँच केले. याद्वारे फार्मास्युटिकल्स, कोव्हिड लसीकरण, मेडिकल असिस्टन्स, लक्षणं न दिसणाऱ्या डीलर्ससाठी विलगीकरण विभाग यासारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत.

यासह कंपनीने ड्रूमर्स आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता, वैद्यकीय विमा कवच या वर्षाकरिता पाच पटींनी वाढवले आहे. तसेच पालकांसाठी वैद्यकीय कव्हरेज ग्रुप इन्शुरन्स प्रदान केले असून ड्रूमर्ससाठी मोफत मानसिक व शारीरिक आरोग्याकरिता टेलीमेडिसीन कन्सल्टेशन लाँच केले आहे. कोव्हिड-१९ मधून बरे होणारे आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा दोघांसाठी ड्रूमने युनिक बडी प्रोग्राम लाँच केला आहे. हे दोन कर्मचारी एकमेकांची मदत घेतील.

ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ श्री संदीप अग्रवाल म्हणाले, “महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. अशा कठीण काळात लोकांना मदत करून समाजाप्रती वचनबद्धता आम्ही दर्शवू इच्छितो. या स्थितीवर मात करण्यासाठी ड्रूमने सर्व भागधारकांसाठी ड्रूम केअर उपक्रम कार्यान्वित केला असून, सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी याद्वारे दिलासा मिळेल. तत्काळ मदत मिळण्यासाठी आम्ही कोव्हिड स्वॅट रुम तयार केली आहे. तसेच आमच्या एका कार्यालयाचे रुपांतर एमर्जन्सी वॉर्डमध्ये केले असून यात आमच्या कर्मचाऱ्यांना गरज असेल तेव्हा मूलभूत वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांचा सल्ला दिला जाईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here