पूर्वी वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंड वसूल करताना नगदी पैसे घेऊन दंडाची पावती देत असत परंतु मे 2019 पासून गैरप्रकार टाळण्यासाठी इ चालणं मशीन द्वारेच दंडात्मक कारवाई करणे आवश्यक करण्यात आले ज्या मध्ये दंड, ऑनलाइन, क्रेडीट/ATM कार्ड द्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली त्याच बरोबर त्या वेळी पैसे उपलब्ध नसतील तर अनपेड ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु ह्या सुविधेचा गैरफायदा घेण्याच्या प्रवृत्ती मध्ये वाढ होऊन मागील वर्षी शहर वाहतूक शाखेने रिकोर्ड ब्रेक कारवाया केल्या जवळपास 75 हजार दंडात्मक कारवाया करून 84 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात
आला,परंतु तरीही जवळपास 40 लाख रुपयांचा दंड वसूल होणे बाकी राहिल्याने
शहर वाहतूक शाखेने अश्या दंड न भरणाऱ्या वाहन चालकांना लेखी नोटीस त्यांचे घरी पाठविण्यास सुरवात केली असून, 10 दिवसात ऑनलाइन, किंवा नजीकच्या कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्या कडे क्रेडिट कार्ड/ATM कार्ड किंवा नगदी दंड भरून पावती घेण्याचे त्यात नमूद केले आहे, 10 दिवसात दंड न भरणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन
न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यात दिला आहे, ह्या बाबत काही शंका असल्यास शहर वाहतूक शाखेत संपर्क करावा असे आवाहन शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।
कोट- दंड भरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून न्यायालयीन कारवाई व वाहन चालविण्याचा परवाना निलंबित होणे ह्या सारखी कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाने त्यांच्यावर प्रलंबित दंड भरून वाहतूक शाखेला सहकार्य करण्याचे आवाहन आहे।