वडनेर गंगाई ग्रामपंचायत चा नाली सफाई घोटाळा; सागर देशमुख यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन…

दर्यापूर – किरण होले

वडनेर गंगाई ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. नुकतेच गावतील नाल्या साफ करण्यात आल्या. नाली सफाई च्या खर्चा बद्दल ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री ढवळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की गावातील नाल्या सफाईसाठी 112 मजुर व 34 ट्रॉली नालीतील गाळ या सर्वांचे 50600 रुपये बिल झाले.

गावाची लोकसंख्या व ईतर गोष्टी लक्षात घेता यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असते तिथे असले घोटाळ्याचे प्रकार व्हायलाच नको याकरिता सागर देशमुख यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

यावेळी दिनकरराव देशमुख रामदासराव रेठे सुधाकरराव वानखडे शाईबउल्ला खान सुभाषराव कोथळकर श्यामभाऊ वानखडे दिपक देशमुख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here