कोरोनाशी झुंज देतांना डॉ.उदय नाईक यांचे निधन…

न्यूज डेस्क – कोणत्याही आजारावर ऍडव्हान्स होमियोपॅथी द्वारे इलाज करण्याचा दावा करणारे तसेच जाहिरातीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले अकोल्याचे नाईक होमिओपॅथी चे सर्वासर्वे डॉक्टर उदय नाईक यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास दुःखद निधन झाले.

यापूर्वी डॉक्टर उदय नाईक व त्यांच्या पत्नी भावना नाईक यांना कोरोना ची लागण झाल्याने त्यांना खासगी इस्पितळात भरती करण्यात आले होते एका आठवड्यापूर्वी डॉक्टर उदय नाईक यांच्या पत्नी भावना नाईक यांचे कोरोना या आजाराने निधन झाले होते.

डॉक्टर उदय नाईक यानाही कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर देखील खाजगी इस्पितळात उपचार सुरु होते आज पहाटे दोनच्या सुमारास डॉक्टर उदय नाईक यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली, हसऱ्या स्वभावाचे मनमिळावू डॉक्टर उदय नाईक यांच्या जाण्याने अकोला शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here