भाई सिद्धार्थ पैठणे यांना गेल्यावर्षी लंडन येथे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार यंदा दिल्ली नोएडा येथे दिला जाणार…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

नाशिक येथील सोनावणे फाउंडेशनच्यावतीने 2020 या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील भाई सिद्धार्थ पैठणे यांची निवड करण्यात आली आहे.

बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व हितासाठी झटणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. भाई सिद्धार्थ पैठणे यांनी बहुजन समाजातील गोरगरीब अनाथ दीनदुबळ्या निराधारांच्या तसेच युवकांच्या समस्या शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचे भरीव काम केले आहे.

त्यांच्या या कार्याची नाशिक येथील सोनावणे फाऊंडेशनने दखल घेत त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली. सदर पुरस्कार हा लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी मिळणार होता. परंतु 2020 या वर्षात कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार पुढे ढकलण्यात आला .

सदर पुरस्कार हा या चालू वर्षात 14 एप्रिल 2021 ला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्ली नोयडा येथे दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यापासून सिद्धार्थ पैठणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here