अहमदपूर व चाकूर – बालाजी तोरणे
लिंगायत समुदायाचे महान संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी संसदेत २२ सप्टेंबर रोजी ३७७ नियम अंतर्गत केली आहे.
डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे १ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले आहे.त्यांनी आयुष्यभर पर्यावरण संरक्षण, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या तत्त्वांचे पालन केले आहे. त्यांचे देशभरात कोट्यावधी अनुयायी आहेत.
आयुष्यभर त्यांनी शिक्षण आणि समाजाच्या उन्नतीसाठी तन व मनाने काम केलेले आहेत.डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हे केवळ लिंगायत समुदायासाठीच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी सत्य, राष्ट्रीय धर्म आणि समाज सेवेची जीवंत मशाल प्रज्वलित केली आहे.
त्यातून नेहमीच लोकांचे जीवन उजाळले आहे. त्यांची देशाबद्दलची भक्ती आणि समर्पण लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे हे योग्य ठरेल.
मी या सन्मानित सदनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करतो की डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी संसदेत केली आहे.