राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे निधन…अहमदपूर येथे आज शासकीय इतमामात विधिवत अंत्यसंस्कार

महेंद्र गायकवाड,बालाजी तोरणे,अहमदपूर तालुका प्रतिनिधी

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे वयाच्या 104 वर्षी नांदेडच्या खाजगी रुग्णालयात आज निधन झाले आहे.दरम्यान अहमदपूर येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात विधिवत अंत्यसंस्कार केले जाणार असून कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणीही अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

चार दिवसापूर्वी अन्नत्याग केल्याने महाराजांची प्रकृती बिघडली होती. यादरम्यान ते संजीवन समाधी घेणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अहमदपुरच्या भक्तिस्थळ भागात हजारो लोक जमा झाले होते, नंतर ही अफवा होती असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अहमदपुर येथील मठाच्या 50 कोटी रूपयाच्या संपत्तीचा तो वाद होता,

अशीही एक चर्चा समोर आली आहे. त्यांनतर महाराजाला भेटण्यासाठी भक्तगण मोठ्या प्रमाणात उत्सूक होता.परंतु डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना उपचारासाठी नांदेड येथील काब्दे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आज त्यांचे निधन झाल्याचा वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यातमाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here