अमरावती | डॉ. बोंडे हाॅस्पिटल त्वरित सिल करा…पैन्थर आक्रमक


माजी कृषी मंत्री डाॅ. बोंडे यांचे राजापेठ येथील हायटेक स्पेशलिस्ट हाॅस्पीटल नाॅन कोवीड हाॅस्पिटल आहे. ICMR व WHO च्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त कोवीड सेंटर मध्येच कोवीड १९ च्या पेशंट चा उपचार करणे अनिवार्य आहे. असे असतांना सुद्धा डाॅ. बोंडे हाॅस्पिटल ने नियम धाब्यावर ठेवून कोवीड रुग्णांचा उपचार सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार दि. २० एप्रिल २०२१ रोजी उघडकीस आला आहे

दिवंगत पंजाबराव तंतरपाडे यांचा मृत्यु झाला तेव्हा तब्बल आठ तास उलटल्यावरही मृतदेह नातेवाईकांना ताब्यात दिला नाही. बेकायदेशीर बील काढुन शिल्लक १ लाख ७६ हजार ९०० रुपये रक्कम जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात देत नाही असे तेथील स्टाफ चे म्हणणे होते. मृत व्यक्तीची फाईल तपासली असता असे दिसले की, दिवंगत पंजाबराव तंतरपाडे हे दिनांक ३ एप्रिल २०२१ ला भर्ती झाले. त्यांचा ५ एप्रिल २०२१ रोजी कोवीड रिपोर्ट पोझीटीव आला. मान्यताप्राप्त कोवीड सेंटर मध्ये रेफर न करता डाॅ. बोंडे हाॅस्पिटल मध्येच त्यांच्यावर उपचार सुरु केला व त्यातच त्यांचा दिनांक २० एप्रिल रोजी मृत्यु झाला. ३ लाखाच्या औषधाव्यतिरीक्त साडेतीन लाख बील हाॅस्पिटल ने बेकायदेशीरपणे काढल्याचे दिसते. डाॅ. बोंडे हे भाजपा चे नेते तसेच माजी कृषी मंत्री असल्याने त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होवू शकत नाही म्हणूनच अनधिकृत गोरखधंधा आणि रुग्णांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जात आहे.

नाॅन कोवीड खाजगी दवाखान्यात हा गैरप्रकार होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होवून कोवीड चे संक्रमण वाढवण्यास मदत होत आहे. तरी आपण स्वत: या प्रकरणात जाती ने लक्ष देवून माजी कृषी मंत्री डॉ. बोंडे यांच्या हाॅस्पिटल वर कठोर कार्यवाही करून हाॅस्पिटल दोन दिवसात सिल करावे. जिल्हाधिकारी कार्यालय समोर पैन्थर सेना आमरण उपोषणास असा इशारा देण्यात आला आहे. तक्रार देते वेळी संदीप भालाधरे, सुरेश तायडे, शितल गजभिये, वर्षा आकोडे, मंगेश कनेरकर, कबीर सारवान, तेजस इंगळे, किरण गुडधे, शुभम महल्ले,व
इत्यादि उपस्थित होते.

प्रेषक,
शितल गजभिये
आँल इंडिया पैन्थर सेना अमरावती जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here