डॉ.मनोहर घुगे यांचा डॉक्टर दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला…

न्युज डेस्क – राष्ट्रीय डॉक्टर्स डे, दीनानिमित्त आपला जीव धोक्यात टाकून रुग्णांना समर्पित सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि वैधकीय क्षेत्रात कार्य करणारे डॉ मनोहर घुगे यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय डॉक्टरांनी समर्पित सेवा देऊन जागतिक महामारी पासून सुरुवातीला पुरेश्या सुविधा नसतांना उपाय योजना केल्या त्यामुळे भारतातील रुग्णांची संख्या व मृतकांची संख्या रोखण्यात भारताला यश आले तसेच लसीकरण मोहिमेमध्ये पुढाकार घेऊन अविरत सेवा देत आहेत.

अश्या सर्व डॉक्टरांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम व करणे हे आपले कर्तव्य आहे असे विचार यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमीक कामगार संघटचे जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांनी व्यक्त केले.डॉक्टर्स डे च्या निमित्याने महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्ह्यातील कोविड १९ मध्ये आपला जीव धोक्यात टाकून समर्पित सेवा दिल्याबद्दल महानगरातील व ग्रामीण भागातील खाजगी तसेच शासकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे व वैधकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन आशिष सावळे यांनी आभार व्यक्त केले.विविध ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला महानगर अध्यक्ष आशुतोष शेंगोकार, विजय रायबोले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here