डहाणू तालुक्यातील डॉ.कल्पिता गावित हिची ‘मेडिकल सायंटिस’ म्हणून निवड…

डहाणू – जितेंद्र पाटील

डहाणू तालुक्यातील कासा गावातील डाॅ. कल्पीता (एम्.डी.) अर्थात सर्वांची आवडती व लाडकी चिंगुताई हिची ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च) येथे “मेडीकल सायन्टीस ,पदावर निवड झाली आहे, त्या बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ICMR ही केंद्र सरकारची आरोग्य सेवेतील सर्वोच्च संस्था असून WHO(जागतिक आरोग्य संघटना) प्रमाणेन काम करते.

डाॅ. कल्पीताने हा मोठा बहुमान संपादन केला आहे.तिने यशाचे शिखर गाठले आहे. या यशामध्ये तिचे खडतर परिश्रम तर आहेतच पण त्या बरोबर जिद्य, चिकाटी व आत्मविश्वास हे गुण आहेत. या जगात जन्माला आल्यापासून तिचा संघर्ष सुरू झाला प्रिमॅच्युअर बेबी असल्यामुळे तिला जन्माला आलेल्या बरोबर श्वास घेण्यासाठी संघर्ष करावा लागला.

तिच्या यशस्वी जीवनात तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.प्राथ. माध्य. दहावी, पर्यंतचे शिक्षण तिने ग्रामीण भागातील कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयात घेतले,पुढे मुंबई त येथे बारावी चे शिक्षण घेऊन मेडिकल प्रवेश घेऊन नंतर एम्.बी.बीएस्, एम.डी.नंतर टाटा रिसर्च फेलोशिप पूर्ण करून आता संशोधक म्हणून निवड झाली आहे.

मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी कल्पिता शालेय जीवनात सर्व विषयात हुशार होती,चित्रकला,रांगोळी सुलेखन, वक्तृत्व ,या मध्ये नेहमी पुढे त्याच प्रमाणे इतर सर्व विषयात नेहमी पैकी च्या पैकी मार्क मिळवत होती.मितभाषी,अभ्यासु,असा स्वभाव असणाऱ्या एका दुर्गम भागातून एवढे मोठे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.तिच्या या यशात तिचे शिक्षक, तिचे आई, वडील यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच तिच्या आजोबा, आजी यांची पुण्याई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here