अकोला – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ.इंदुप्रकाश गजभिये वय ७१ यांचे आज रविवारी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान निधन झाले.
डॉ इंदुप्रकाश हे गेल्या १५ दिवसापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते मात्र त्याची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला .एक सामाजिक जबाबदार वैद्यकीय अधिकारी होते.
त्यांनी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सेवा बजावली. वयाच्या 58 व्या वर्षी ते नागपूरच्या आयजीएमसीमधून निवृत्त झाले.