महापालीकेचे ब्रॅंड अंबेसिडर म्हणून निवड झालेबद्दल डाॅ.दिलीप पटवर्धन व डाॅ.सौ.माधवी पटवर्धन यांचा सत्कार संपन्न.

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ.दिलीप पटवर्धन माजी अध्यक्ष, जीवनविद्या मिशन मुंबई आणि त्यांच्या पत्नी नेत्र तज्ञ डॉ.सौ.माधवी पटवर्धन यांचे,महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा मोहिमेसाठी ब्रँड अंबेसिडर म्हणून निवड केली आहे. यानिमित्ताने या दोघा डॉक्टर दांपत्याचा, विद्यानगर ज्येष्ठ नागरिक संघ विश्रामबाग व प्लेजरपार्क रहिवासी, विश्रामबाग सांगली यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता.

यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, वार्ड नंबर आठ चे नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सुप्रसिद्ध होमियोपथी तज्ञ डॉ.अशोक लेंडवे व सौ स्नेहल अभ्यंकर मेडम यांनी अनुक्रमे डॉ.दिलीप पटवर्धन व डॉ. माधवी पटवर्धन यांचा सत्कार केला.

यावेळी जीवनविद्या मिशनचे सोशल मिडीया प्रमुख व जीवन संदेशचे संपादक सुधाकर पाटील व भागातील नागरिक उपस्थीत होते.
यावेळी .महापौरांनी ब्रँड अंबेसडर ची संकल्पना काय आहे आणि त्यांच्या निवडीचे महत्व सविस्तर विशद केले.
यावेळी डॉक्टर दांपत्यानी सत्काराला उत्तर देताना मिळालेल्या संधीचे सोने करून जीवनविद्येच्या तत्वज्ञानावर अधिन राहून सांगली-मिरज-कुपवाड शहराचे नांव लौकिकामधे भर पाडू अशी ग्वाही दिली.

उपस्थित नागरिकांना प्लेझरपार्क मधील रहीवाशी व जीवन विध्या मिशन सांगली शाखेचे खजीनदार शंकरराव बंगी यांनी जीवनविद्या मिशन व दै. लोकमत यांच्या वतीने काढलेली कालदर्शिका मोफत भेट म्हणून दिल्या. या कार्यक्रमाचे, हरीष माळी यांनी सूत्रसंचालन केले व अरूण कुलकर्णी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here