राहुल मेस्त्री..
कोगनोळी तालुका निपाणी येथे डॉ. बी. आर. आंबेडकर अभिवृद्धि संघ कर्नाटक यांच्या अंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील पहिले..अध्यावत फॅशनचे स्वरांजली वालकेर्स फुटवेअर शोरूमचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.सदर शोरुमचे उदघाटन जोल्ले उद्योग समुहाचे प्रमुख बसवकुमार जोल्ले आणि माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापुन करण्यात आले.
यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले कोगनोळी व परिसरामध्ये सुशिक्षित तरुणांची संख्या जास्त आहे या तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योगधंद्यांमध्ये आपला ठसा उमटवावा. अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय योजनेतून मिळणाऱ्या अनुदानासाठी जे सहकार्य लागेल ते मी सर्वतोपरी प्रयत्न करून ते मिळवून देण्यासाठी सहकार्य करून उद्योगधंदे उभे करण्यासाठी मदत करेन.

संतोष माने यांनी वॉलकेअर्स फुटवेअर शोरूमचा माध्यमातून कोगनोळीची नाळ शहराला जोडल्याने कोगनोळीगावाचे नाव लौकिक झालेले आहे. असेच नवनवीन उद्योग तरुण वर्गाने सुरू करावेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे ते म्हणाले.
या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर बी. आर. आंबेडकर अभिवृद्धि संघ बेळगाव जिल्हा मॅनेजर चींनन्नावर, वॉलकेर्स कंपनीचे विभाग प्रमुख याकुब सर व तालुका वेलफेअर अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कोगनोळी येथील या कार्यक्रमास बाळासाहेब कागले, धनाजी कागले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत,दिलीप पाटील,

धनाजी पाटील, प्रविण भोसले,रामदास गाडेकर, विठ्ठल मुरारी कोळेकर, झाकीर नाईवाडे,नामदेव यादव, रावसाहेब पाटील, पंडित माने, तुकाराम माने, संदीप माने, प्रकाश कदम, कुमार व्हटकर ,नितीन कानडे,बाबासाहेब आवटे,मिलिंद आवटे,यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.