महिला आयोग सदस्या व राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ.आशाताई मिरगे यांच्यासह मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल…

अकोला – अकोल्यातील महिला आयोगाच्या सदस्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या,पदाधिकारी डॉ.आशाताई मिरगे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई जुनेशहर पोलिस स्टेशन ठाण्यात नोंदविण्यात आली असून सदर घटनेमुळे घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ.आशाताई मिरगे यांच्यासह मुलगा अनिमेष विरुद्ध कार खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप ह्युंडाई शोरुमचे संचालक विवेक पारसकर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केला आहे.

प्राप्त माहितीनुसार,डॉ. आशा मिरगे व अनिमेष यांनी अनिमेषच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने ६ लाख ६८ हजार रुपये किमतीची असेंट कार ३० सप्टेंबर २०१९ रोजी पारसकर ह्युंडाई येथून खरेदी केली. विवेक पारसकर यांच्याशी परिचय असल्याने डॉ.मिरगे यांनी लोन केस होत नसल्याचे कारण सांगून सुरुवातीला काही रक्कम दिली व उर्वरीत राशी धनादेशाद्वारे देण्याचे सांगितले.

डॉ.मिरगे यांनी मुलगा पुण्याला राहत असल्याचे सांगून वाहनाची पासींग देखील करुन घेतली. पैशाची मागणी केल्यावर आशा मिरगे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश २ मार्च २० रोजी दिला. परंतु त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली.

मिरगे यांच्याकडून पारसकर यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू असल्याने कंटाळून विवेक पारसकर यांनी जुनेशहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.तक्रारीवरुन पोलिसांनी डॉ. आशा मिरगे व अनिमेष मिरगे विरुद्ध भादंविचे कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here