पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करत असताना डझनभर भाजप कार्यकर्ते जखमी…

न्यूज डेस्क – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात भाजपाद्वारे साजरा केला जात आहे,तामिळनाडूच्या चेन्नईत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस साजरा करत असताना डझनभर भाजप कार्यकर्ते जखमी झाले.

पंतप्रधानांचा वाढदिवस चांगला व्हावा यासाठी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संखेने जमले असताना आनंद साजरा करतांना फटके उडविण्याच्या नादात बलून मध्ये स्फोट झाला सदर बलून मध्ये हेलियम गॅस असल्याने स्फोट झाला तर जवळच्या असलेल्या फटक्यांना आग लागल्याने मोठा आवाज त्या ठिकाणी झाला,

स्फोटांमुळे तिथे जमलेली लोक सैरावैरा पळाली यात अनेकांच्या अंगावरील कपडे जळाले असून यात डझनभरच्या आसपास लोक जखमी झाले आहे. स्फोटानंतर लगेचच हा क्षण कॅमेर्‍याबद्ध केल्या गेले.व्हिज्युअल देखील पोलिसांना परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतात.

Courtesy -J Sam Daniel Stalin

भाजपाच्या तामिळनाडू संघटनेच्या च्या वतीने सांगण्यात आले कि डझनहून अधिक सभासदांना किरकोळ दुखापत झाली आहे. फटाक्यांनी हेलियमने भरलेल्या बलूनमुळे स्फोट झाला असल्याचे सांगितले.

या उत्सवाला मात्र राज्यात निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले म्हणून पाहिले जात आहे. यामध्ये पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई असतांनाही एवढी गर्दी जमली कशी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here