काळजी करु नका!…सरकार मदत करेल…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं आश्वासन

फोटो - सौजन्य ANI

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले असून दुपारी दोन, अडीच च्या दरम्यान ते दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी केली. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, खासदार सुनील तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

दुर्घटनाग्रस्त तळीये गावास भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया जाणून घ्या आणखी काय म्हणाले….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी

मदत कार्यात लष्काराची मदत मिळत आहे
भविष्यात दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली जाईल
आवश्यक असेल तिथे नागरिकांचे स्थलांतर करणार
जलआराखडा तयार केला जाईल
काळजी करु नका, सरकार मदत करेल
कागदपत्रं गहाण झालं असेल तर त्याचा विचार करु नका, उद्धव ठाकरेंचे आश्वासन

रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून काल भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here