अमरावतीत तणावपूर्ण शांतता…शहरात संचारबंदी लागू…अफवांवर विश्वास ठेवू नका…

अमरावती – काल झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीत शहरात प्रचंड दणाव आणि दशहतीचे वातावरण आहे. आज शहरातील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला असून दुकानांची तोडफोड केली जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.

कालपासून अमरावती शहरात सुरु असलेल्या जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केला आहे. 144 कलम लागू असलेल्या परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तत्काळ अटक करू शकतात. या प्रकरणी वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

दरम्यान, अमरावतीत दोन गटातील वादाला हिंसक वळण मिळाल्यामुळे शहरात दंगानियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला तरीही उर्वरीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here