डोंगरशेवलीत “वरली मटका जोमात….! प्रशासन कोमात…! अनेकांचे संसार वरली मटक्यामुळे उन्हात…

चिखली – राहुल गवई

चिखली तालुक्यातील व बुलढाणा तालुका या दोन सीमेवरील डोंगर शेवली हे गाव.तसा या गावाला राजकीय वारसा लाभला आहे परंतु या गावात दारू, वरली, मटका जोरात चालू आहे.आज वरली मुळे गावातील लहान मुले , शाळेतील मुले, आणि स्त्रिया सुध्दा वरली मटका खेळायला लागले.

लहान मुले आज वरलीमुळे आणि दारू मुळे व्यसनाधीन झाले आहेत.आज गावातील बसस्थानका पासून ते पुर्ण दलीत वस्ती मध्ये दारू चे वरली दुकानं खुलेआम चालू आहे.ज्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी शांततेच्या मार्गाने चालनाचा मार्ग सांगितला त्याच बौद्ध वस्तीत वरली जोमाने सुरू आहे.

तथागत गौतम बुद्धाच्या पुतळा समोर या किन्होळा येथील बाहेकराची वरली चे दुकान चालु आहे.परंतु आमडापुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार व सर्व पोलीस प्रशासन ला जणू या वरली वाल्यांनी विकतचं घेतले आहे.म्हणजे याची हप्ते या वरली वाल्याणी ठरवुन दिलें आहे. यामुळे दलीत वस्तीतील युवक,बेघर झाले आहे आणि लहान मुले हे व्यसनाधीन झाले आहे. याची थोडी भान ठेवून डोंगर शेवली येथील वरलीचे दुकाने बंद करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here