डोळखांब – कसारा मार्गांवर दोन विविध अपघात…आठवडी बाजारासाठी जाणाऱ्या खाजगी गाड्यांचा अपघात…

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

डोळखांब कसारा मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातांमध्ये तब्बल वीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. जखमींमध्ये लहान मुले महिला व पुरुष यांचा समावेश आहे.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये काही प्रवाशांची परिस्थिती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा रुग्णालय पाठवण्याचे आले आहे.

आठवडा बाजारासाठी तळवाडा वरून डोळखांब येथे जाणारी पिकप व्यान आणि कमांडर जीप यांचा वेगळ्या ठिकाणी अपघात झाला आणि या दोन अपघातांमध्ये सदर प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here