अमरावती | रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत आहे का?…देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सवाल…

फोटो -सौजन्य गुगल

अमरावती – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दंगल भागात दौरा करून पाहणी केली त्यांतर पत्रकारांशी संवाद साधला, हिसांचारात झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत चद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे? असा सवाल करतानाच रझा अकादमीवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते? मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती. तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे आणि कुणाचं पिल्लू आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटतं ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. आहे का हिंमत? काँग्रेसमध्ये आहे का हिंमत? असा सवाल फडणवीसांनी केला.

13 तारखेची घटना ही 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन होती. पण कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई 13च्या घटनेवर सुरू आहे. 12च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. त्यावर कोणताही नेता बोलत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूरही बोलत नाही. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणं आम्हाला मान्य नाही. पण चुकीच्या घटनेचं लांगूलचालन होत असेल तर आम्हाला मान्य नाही, असं सांगतानाच 12 तारखेच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. त्याचं कारण काय? मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? ही शंका वाटते, अशी शंका फडणवीस यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीसांची ही पत्रकार परिषद होताच यशोमती ठाकूर यांनी ट्वीट केलं. अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here