Monday, December 11, 2023
HomeSocial Trendingचहात कोणी बटर टाकते का?...व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

चहात कोणी बटर टाकते का?…व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया…

Spread the love

न्युज डेस्क – सोशल मिडीयावर फूड ब्लॉगर आगळ्या रेसिपिंचे व्हिडिओ शेयर करीत असतात. आतापर्यंत तुम्ही सोशल मिडीयावर अनेक आगळ्यावेगळ्या पद्धतीने जेवण बनविण्याचा रेसिपी बघितल्या असतील तर आता चक्क चहात बटरचा कसा उपयोड करतात ते एका चहावाल्यांनी सांगितले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

‘तडका चहा’ असे चर्चेत आलेल्या चहा टपरीचे नाव आहे. विशेष म्हणजे यात साखर, चहाची पाने, दूध, आले आणि पाणी याशिवाय इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण या तडका चहामध्ये बटर आणि मसालेही टाकले जातात. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये काका हे बोलतानाही ऐकू येत आहेत की हा फ्लेवर्ड चहा 1945 पासून बनवला जात आहे. पण या मध्ये टाकले जाणारे अमूलचे बटर असून अमूलची स्थापना 14 डिसेंबर 1946 ला झाली होती. तर ते आधी काय टाकायचे?…

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (@officialsahihai) नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – दाल मखानी किंवा चाय मखानी. हा अजब चहा पाहून लोक थक्क होतात. हा चहा पाहून चहाप्रेमींची मने दुखावतात. बहुतेक लोकांना त्यांच्या आवडत्या पदार्थावर प्रयोग करायला आवडत नाही.

त्यामुळेच ही क्लिप पाहिल्यानंतर सगळ्यांनाच राग आला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहा बनवण्यासाठी गरम भांड्यात भरपूर बटर टाकले जाते, त्यानंतर दूध आणि गुलाबाची पाने टाकली जातात. एवढेच नाही तर त्यात बदामही टाकले जातात. 14 सप्टेंबर रोजी पोस्ट केलेला हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला तो थक्क झाला.

एका वापरकर्त्याने टिप्पणी केली – थोडी हळद, धणे आणि काकडी देखील घाला. दुसर्‍याने चहा वाल्याचा पत्ता लिहिले आहे – अमृतसर, रेल्वे स्टेशन जवळ, वोल्गा हॉटेल जवळ पेट्रोल पंपासमोर, हा चहा आहे ₹ 150 चा मीळतो या पत्ता खरा आहे कि खोटा हे आम्हाला पण माहित नाही, आणखीन एक वापरकर्त्याने टिप्पणी करतो कि मी आता हेच पाहण्यासाठी जगतोय. त्याच वेळी, दुसरा वापरकर्ता म्हणाला – गरम मसाला घाला, क्रीम घाला.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: