अकोल्यातील कोरोना रुग्णांना उपचारा करीता मुर्तिजापुर उपजिल्हा रुग्णालयात आणू नका…मुर्तिजापुर येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन…

मुर्तिजापुर येथे ठेवण्याचे निर्णय अकोला जिल्हा शासकीय स्तरावर झालेला निर्णय रद्द करावा…

मुर्तिजापुर – अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग व मृत्यूचे वाढते प्रमाण बघता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जागा अपुरी पडत असल्याने रुग्णांना मुर्तिजापुर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व इतर हॉस्पीटल मध्ये ठेवण्याचा जो निर्णय जिल्हा शासन स्तरावर घेण्यात आला आहे.

तर निर्णय जिल्हा शासन स्तरावर घेण्यात आला आहे तो निर्णय तात्काळ रद्द करून तालुक्यातील येणाऱ्या तालुका अंतर्गत रुग्णानसाठी हि व्यवस्था ठेवण्यात यावी कारण तालुक्यातील लोकसंख्या पाहता उपजिल्हा रुग्णालयामध्ये ४० बेड व ३ आय.सी.यु. बेड ची व्यवस्था आहे. ही तालुकास्तरावरील लोकसंख्येच्या प्रमाणात फार अल्पशी अशी आरोग्य व्यवस्था आहे.

तसेच इतर तालुक्यातुन व जिल्हा स्तरावरुन येणाऱ्या रुग्नाणापासुन मुर्तिजापुर शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवु शकते. व मुर्तिजापुर शहरामध्ये कोरोना कोविड-१९ रुग्णांची संख्या नसल्यामुळे येणाऱ्या दिवसात अशा काही निर्णयामुळे रुग्ण वाढु शकतात.

तरी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने शासन स्तरावर हि मागणी करीत आहो की तालुका अंतर्गत येत असलेल्या कोरोना रंगणाना उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथे उपचाराकरीता घेण्यात यावे व बाहेर तालुक्यातील व अकोला जिल्हयातील कोरोना रुग्णांची पर्यायी व्यवस्था हि जिल्हा स्तरावरच करण्यात यावी असा आग्रह

आम्हा सर्व पक्ष भाजपा,राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस,शिवसेना,वंचित बहुजन आघाडी,मनसे,प्रहार जनशक्ती,MIM चे तालुका व शहर पदाधिकारी यानी पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने करीत आहोत. करीता आपण वरील प्रकरणावर गांभीर्याने दखल घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here