जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड…

पालघर – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली असून वैदेही वाढाण यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांची निवड झाली आहे. आज दि.२०/७/२०२१ रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली.

अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले आणि वैदेही वाढाण यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे आणि महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.

मा.जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांनी ७ जुलै २०२० रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ९ जुलै २०२१ पासून समाजकल्याण सभापती विष्णू कडव अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here