नव्या वर्षात मुंबई विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस डिजेसीएचा हिरवा कंदील…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

संध्या अनियमित असलेली कोल्हापूर मुंबई विमान सेवेच्या बाबतीत आनंदाची बातमी असुन एक जानेवारी पासून आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे या बाबत डीजीसीए कडुन विमान सेवा पुरवणारी टु जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली संध्या कंपनीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे कोल्हापूर मुंबई विमान सेवा काही काळासाठी स्थगित असुन मागील काही दिवसांपासून वारंवार मुंबई विमान सेवा खंडित होत असल्यामुळे प्रवाशांमधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आठवड्यात कधी एक दिवस तर कधी दोन दिवस असे संचालन होत आहे.तसेच काहीवेळा संपूर्ण आठवडा टु जेट कंपनीची विमान सेवा ठप्प होत आहे.सदर विमान सेवा नियमित करण्यासाठी प्रवाशांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे. मुबई विमानसेवेला कोल्हापूरातुन चांगलं प्रतिसाद मिळत असून या सेवेचे बुकींग जोरात सुरू आहेत.

पुढील आठवड्यापासून निर्धारित वेळापत्रकानुसार आठवड्यातील तीन दिवस नियमीत विमानसेवा सुरू होत आहे नविन वर्षात मात्र तीन दिवस ऐवजी सात दिवस विमान सेवा सुरू राहणार असल्याचे जेट कंपणीचे अधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले कोल्हापूर विमान सेवा पुरवणारी टु जेट कंपनीकडे विमानांची संख्या मर्यादित असल्यामुळे व इतर मा्र्गावरती विमान उपलब्ध विमान वळविल्यामुळे कोल्हापूर मुंबई विमान सेवा वारंवार खंडित होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

नियमीत विमान सेवा पुरवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संबंधित कंपनीवर दबाव टाकण्याची गरज बोलुन दाखवण्यात येत आहे कोल्हापूर मुंबई विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.नविन वर्षात टु जेट कंपनीकडुन कोल्हापूर मुंबई विमान सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होत असुन आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा पुरवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होतो त्याला आता यश आले आहे रणजीत कुमार काटारिया अधिकारी टु जेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here