नगरसेविका स्मिता वस्ते यांच्यातर्फे नागरिकांना दिवाळी भेट…

पुणे – कोरोनाचे मनातील भय दूर व्हावे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पर्वती (प्रभाग क्रं. २९) येथील नगरसेविका स्मिताताई पद्माकर वस्ते आणि माजी नगरसेवक विनोद वस्ते यांच्यातर्फे नागरिकांना दिवाळी फराळ आणि दिवाळी सुगंधी किट भेट देण्यात आले.

दिवाळीत नागरिकांशी संवाद साधून लक्ष्मीनगर पूरग्रस्त वसाहत, शाहू वसाहत, महात्मा फुले वसाहत, आंबेडकर वसाहत येथील नागरिकांना भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत चार हजार दिवाळी किट भेट देण्यात आल्या. यात चिवडा-लाडू पॅकेट तसेच उटणे, पणत्या, साबण, सुवासिक तेल यांचा समावेश होता.

या बरोबरच नागरिकांमध्ये कोरोना जनजागृती करण्यात आली. आपुलकीच्या दिवाळी भेटीने नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद झळकला. या उपक्रमाचे नियोजन प्रेमळ हनुमान मंडळ ट्रस्ट आणि सह्याद्री सेवा प्रतिष्ठान यांनी केले. तर शिरीष देशपांडे, राजेंद्र तावडे, मोहित झांजले, सलीम सिंदगी, नागेश लोहार, बाळासाहेब दुबळे, कादर शेख, मनोज शेलार, प्रशांत गायकवाड, दशरथ गंगावणे, साधना पंडित, निशा खेनट, सुनंदा नारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here